श्रावण

Whole sixteen days late to post this! Today is the 16th Day of the Month of Shravan!

Shravan! The Fifth month of the Hindu calendar brings with it the season of festivals. This favourite month of Indian women was also a very common topic of essay during our school days. This is something I mustered up while I was preparing for exams.

Read and Respond guys! 🙂

श्रावणमासी हर्ष मानसी!

ही कविता लहानपणी किती वेळातरी म्हणालो असू. पावसावरच्या प्रत्येक निबंधाची सुरवात यानेच व्हायची. आमचा देखील पिढीने हा महिना अनुभवला. तो पावसाचा आणि उन्हाचा धरपकडीचा खेळ! चहूबाजूला पसरलेली ती मखमली हिरवळ. त्यावर  भूरभुरणारे पावसाचे उन्हात चमकणारे सूक्ष्म तुषार! सणवार! व्रतवैकल्ये! यांच्याच जोडीने येणारे पारंपरिक पदार्थ आणि दरोज वाचल्या जाणाऱ्या कहाण्या!

मी त्या कहाण्या आजीला वाचून दाखवायचे आणि मग आजी मला एक कहाणी सांगायची. श्रावण महिन्याची कहाणी!

खूपखूप वर्षांपूर्वी, जेव्हा ऋतु निर्माण झाले नव्हते. पृथ्वीवर निवडक वस्ती होती आणि देव पृथ्वी सजवत होता. बर्फाच्या गोळ्या पासून तयार झालेली आपली धरणी खूपच थंड होती. इतकी थंड की जीव-जनावरं तागच  धरत नव्हती. मग देवाने उष्णता निर्माण केली. हळूहळू पृथ्वी उबदार झाली. प्राणी सुखावले! उबदार पृथ्वी गरम झाली तशी सगळे धास्तावले. असाच महिना गेला आणि पृथ्वी वणवा पेटावा तशी होरपळू लागली. वैशाख वणवा पिसाटला.जमीन कोरडी झाली. पाण्याचे जलाशय आटले! सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले.

गेले सगळे देवाकडे साकडं घालायला. “देवा देवा पाणी दे”! तथास्तु म्हणून पाऊस दिला! मुसळधार पावसाने जमीन सुखावली. तिची कुस उजवली. जिथे तिथे कुरणे उगवली आणि देवाच्या कुंचल्यात अजून रंगाची भर पडली. पण पृथ्वीचं नष्टचर्य अजून संपल नव्हतं!

मुसळधार पडणारा पाऊस आता जीवन देता देता घेऊ लागला. जलप्रलय आला. हिरव्यागार रंगात न्हालेली पृथ्वी आता मातकट रंगात मळून गेली. देवालाही तिचं अस रूप बघावेना. काय करावं? काय करावं? अश्या विचारात असताना त्याला एका झाडावर एकुलतएक वाचलेलं घरटं दिसलं. चिमणीने तिच्या पिल्लांसाठी खूप सारा चारा जमवून ठेवला होता आणिती चिमणी दरोज थोडा थोडा चारा पिल्लांना भरवतहोती.

मग देवाच्या डोक्यात प्रकाश पडला! भराभर आदेश सुटले! पाऊस कमी झाला! आणि तब्बल एका महिन्याने पडलेल्या उन्हात पृथ्वी सुखावली! पण देवाने इथे एक शक्कल लढवली. त्याने पाऊस काही थांबवला नाही. असा सुरू झाला तो उनपावसाचा प्रवास. हातात हात घालून! जोडीने!

पृथ्वी मस्त सजली.सततच्या त्रासाने  क्षिणलेली ती श्रांत झाली. असा तो श्रावण!

श्रांत करणारा श्रावण!

2 comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s